Thursday, September 11, 2008

सुविचार

सुविचार
* स्वतःवर श्रद्धा असेल तर ईश्वरावरही श्रद्धा बसेल.
* ज्ञानात मिळते तेवढे परमसुख कशातही नाही.
* मोठया घरापेक्षा मोठे हृदय कधीही श्रेष्ठ.
* नियम अगदी थोडा करावा पण तो प्राणापलिकडे जपावा.
* स्वतःची चूक कबूल करायला मनाचा मोठेपणा लागतो.
* विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.
* आळस, अज्ञान व अंधश्रद्धा माणसाचा घात करतात.
* प्रयत्न करा...............असाध्य असे काहीही नाही.
* चांगला विचार लगेचच आचरणात आणावा.
* साधी रहाणी पण उच्च विचारसरणी असावी.
* माणूसकीचा ओलावा पैशाच्या उबेपेक्षा श्रेष्ठ असतो.
* संयमाने पशुचा मनुष्य व मनुष्याचा देव होतो.
* सौंदर्य वस्तुत नसून पहाणा~याच्या दृष्टीत असते.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...