Thursday, September 1, 2011

ठाणे शहर

संपुर्ण ठाणे शहराची एक झलक बघण्यासाठी हा व्हिडीओ पहा.
ठाणे शहरातील बॅंकांची यादी,पत्ते, व फोन यासाठी हे पान उघडा.
ठाणे शहराची बीझनेस डिरेक्टरी पाहाण्यासाठी हे पान उघडा. 

Wednesday, June 3, 2009

मला स्फ़ुरलेली कवीता

मला स्फ़ुरलेली कवीता
माझ्यातल्याच मीला शोधत आहेत माझे डोळे
ओवळ्यात राहून परमेश्वरा कसे पाळू बरं सोवळे
मझ्यातलाच मी, सृजनशील मी, स्फ़ुरणशील मी,
कधीतरी पहातील का या सृजनशीलत्वाला, स्फ़ुरणशीलत्वाला माझे डोळे
उलगडेल का रे माझेच मला हे कोडे ?
माझ्यातल्याच मीला शोधत आहेत माझे डोळे !!

जेव्हा मी पहातो एखादे सुंदर असे चित्र,
जागा होतो माझ्यातला चित्रकार, कल्पना घेउ लागतात आकार,
कल्पना कल्पनेचेच पंख पसरुन मारतात उंच उंच भरा~या जातात सीमापार,
कधितरी होईल का रे माझ्या कुंचल्यातुन एखादे सुंदर असे चित्र साकार
उलगडेल का रे माझेच मला हे कोडे ?
माझ्यातल्याच मीला शोधत आहेत माझे डोळे !!

Thursday, February 5, 2009

आसक्ती (संग्रहीत)

आसक्ती (संग्रहीत)

साऱ्या आशेची निराशा
आणी भंग पावलेल्या अपेक्षा
तुटलेल्या स्वप्नांची गाथा
आणि जीवनाचा एकटेपणा.

एक दिवस हे सर्वच
नकोसं वाटून गेलं
आयुष्याचा शेवट करण्यासाठी
नकळत पाउल वळलं.

पण स्वत:ला संपवण्याचं
धैर्य माझ्यात नव्हतं
आणि मरणापेक्षा जगणंच
सोपं वाटून गेलं.

Sunday, February 1, 2009

माझं मन (संग्रहीत)

माझं मन (संग्रहीत)

सारी निमित्तं आणी कारणं
मागे टाकुन
हवेत एक मनमोकळा
श्वास घेउन
आज माझं मन
कागदावर उतरू पाहतंय.

माझ्या आनंदात
खुषीच्या लहरींवर
सारा आसमंत बरोबर घेउन
आज माझं मन
कागदावर उतरू पाहतयं.

माझ्या नजरेतून
कधी कृतीतून
तू ओळखलस तरीही
शब्दांच्या आधाराने
आज माझं मन
कागदावर उतरू पाहतयं.

Monday, December 22, 2008

आशा (संग्रहीत)

आशा (संग्रहीत)

मी गेल्यावर हसतील सारे
कुणी एक तरी रडेल का?
जो एक कधी रडेल
तो मला कधी भेटेल का?

ओठावर हसू माझ्या
दिसले सा~या जगाला
डोळ्यातील अश्रू माझ्या
दिसतील फक्त त्याला.

एक आशा माझ्या मनी
दिसेल तो शेवटच्या क्षणी
तेव्हा मी हसेन आणी
त्याच्या डोळा येईल पाणी.

Monday, December 15, 2008

काही चारोळ्या (संग्रहीत)

काही चारोळ्या (संग्रहीत)
****************
थंड हवा, ढगाळ आकाश,
धुक्यात डोंगर,आणि मातीचा सुवास,
गरमागरम भजी आणि कडक चहा,
पावसात चिंब भिजायला तयार रहा.
*****************************************
पावसात चिंब भिजावे असे उन्हाने एकदा ठरवले,
सप्त रंगांची उधळण करत तेव्हा नभी
इंद्रधनु अवतरले.
*****************************************
अनंत मायेतुनी काया ती उजळावी,
मुर्तिमंत सौंदर्याचि ओळख पटावी,
उभी मी येथे डोळे लाऊन वाटेकडे,
दिसती दूर क्षितिजावरती प्राजक्ताचे सडे.
*****************************************
क्षण हे असे निसटुन जाती हातातुनी,
मग काय उपयोग आहे रडूनी,
या क्षणाचे सोने करावे,
आयुष्य अवघे या क्षणात जगावे.
*****************************************
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खूप सारे प्रेम अन थोडासा रागवा,
नको अंतर कधी नको दूरावा,
पावसाला लाजवेल इतका
मैत्री मधे असावा ओलावा.
*****************************************
गुलाबी थंडी सोनेरी प्रकाश,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवे प्रयत्न नवा विश्वास,
नव्या यशासाठी नवा ध्यास.
*****************************************

Monday, October 13, 2008

सांगा कसं जगायचं !

सांगा कसं जगायचं !

सांगा कसं जगायचं
कण्हत कण्हत, की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा !

डोळे भरून तुमची आठवण
कुणीतरी काढतंच ना,
ऊन ऊन दोन घास
तुमच्यासाठी वाढतंच ना,
शाप देत बसायचं की
दुवा देत हसायचं,
तुम्हीच ठरवा !

पेला अर्धा भरला आहे
असंसुद्धा म्हणता येतं,
पेला अर्धा सरला आहे
असंसुद्धा म्हणता येतं,
सरला आहे म्हणायचं
की भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा !

काळ्याकुट्ट काळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेऊन उभं असतं,
काळोखात कुढायचं
की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा !

पायात काटे रूतून बसतात
हे अगदी खरं असतं,
आणी फुले फुलून येतात
हे काय खरं नसतं,
काट्यासारखं सलायचं
की फुलासारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा !

संग्रहीत काव्य.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...