Thursday, September 4, 2008

एवढीच माझी इच्छा

एवढीच माझी इच्छा
विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर, ही माझी प्रार्थना नाही
विपत्तीमधे मी भयभीत होवू नये, एवढीच माझी इच्छा ॥
दु:ख तापाने व्यथित झालेल्या मनाचं तू सांत्वन करावं,
अशी माझी अपेक्षा नाही
दु:खावर जय मिळवता यावा, एवढीच माझी इच्छा ॥
जगात माझं नुकसान झालं, केवळ फसवणूक वाट्याला आली,
तर माझं मन खंबीर रहावं, एवढीच माझी इच्छा ॥
माझं तारण तू करावंस, मला तारावंस ही माझी प्रार्थना नाही
तरून जायचं सामर्थ्य माझ्यात असावं, एवढीच माझी इच्छा ॥
माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस,
तरी माझी तक्रार नाही,
ते ओझं वाहण्याची शक्ती मात्र माझ्यात असावी,
एवढीच माझी इच्छा ॥
सुखाच्या दिवसात नतमस्तक होवून मी तुझा चेहेरा ओळखेन,
दु:खाच्या रात्री सारं जग जेंव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा,
तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होवू नये,
एवढीच माझी इच्छा ॥

रविंद्रनाथ टागोर.

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...