Wednesday, June 3, 2009

मला स्फ़ुरलेली कवीता

मला स्फ़ुरलेली कवीता
माझ्यातल्याच मीला शोधत आहेत माझे डोळे
ओवळ्यात राहून परमेश्वरा कसे पाळू बरं सोवळे
मझ्यातलाच मी, सृजनशील मी, स्फ़ुरणशील मी,
कधीतरी पहातील का या सृजनशीलत्वाला, स्फ़ुरणशीलत्वाला माझे डोळे
उलगडेल का रे माझेच मला हे कोडे ?
माझ्यातल्याच मीला शोधत आहेत माझे डोळे !!

जेव्हा मी पहातो एखादे सुंदर असे चित्र,
जागा होतो माझ्यातला चित्रकार, कल्पना घेउ लागतात आकार,
कल्पना कल्पनेचेच पंख पसरुन मारतात उंच उंच भरा~या जातात सीमापार,
कधितरी होईल का रे माझ्या कुंचल्यातुन एखादे सुंदर असे चित्र साकार
उलगडेल का रे माझेच मला हे कोडे ?
माझ्यातल्याच मीला शोधत आहेत माझे डोळे !!

Thursday, February 5, 2009

आसक्ती (संग्रहीत)

आसक्ती (संग्रहीत)

साऱ्या आशेची निराशा
आणी भंग पावलेल्या अपेक्षा
तुटलेल्या स्वप्नांची गाथा
आणि जीवनाचा एकटेपणा.

एक दिवस हे सर्वच
नकोसं वाटून गेलं
आयुष्याचा शेवट करण्यासाठी
नकळत पाउल वळलं.

पण स्वत:ला संपवण्याचं
धैर्य माझ्यात नव्हतं
आणि मरणापेक्षा जगणंच
सोपं वाटून गेलं.

Sunday, February 1, 2009

माझं मन (संग्रहीत)

माझं मन (संग्रहीत)

सारी निमित्तं आणी कारणं
मागे टाकुन
हवेत एक मनमोकळा
श्वास घेउन
आज माझं मन
कागदावर उतरू पाहतंय.

माझ्या आनंदात
खुषीच्या लहरींवर
सारा आसमंत बरोबर घेउन
आज माझं मन
कागदावर उतरू पाहतयं.

माझ्या नजरेतून
कधी कृतीतून
तू ओळखलस तरीही
शब्दांच्या आधाराने
आज माझं मन
कागदावर उतरू पाहतयं.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...