Monday, December 22, 2008

आशा (संग्रहीत)

आशा (संग्रहीत)

मी गेल्यावर हसतील सारे
कुणी एक तरी रडेल का?
जो एक कधी रडेल
तो मला कधी भेटेल का?

ओठावर हसू माझ्या
दिसले सा~या जगाला
डोळ्यातील अश्रू माझ्या
दिसतील फक्त त्याला.

एक आशा माझ्या मनी
दिसेल तो शेवटच्या क्षणी
तेव्हा मी हसेन आणी
त्याच्या डोळा येईल पाणी.

Monday, December 15, 2008

काही चारोळ्या (संग्रहीत)

काही चारोळ्या (संग्रहीत)
****************
थंड हवा, ढगाळ आकाश,
धुक्यात डोंगर,आणि मातीचा सुवास,
गरमागरम भजी आणि कडक चहा,
पावसात चिंब भिजायला तयार रहा.
*****************************************
पावसात चिंब भिजावे असे उन्हाने एकदा ठरवले,
सप्त रंगांची उधळण करत तेव्हा नभी
इंद्रधनु अवतरले.
*****************************************
अनंत मायेतुनी काया ती उजळावी,
मुर्तिमंत सौंदर्याचि ओळख पटावी,
उभी मी येथे डोळे लाऊन वाटेकडे,
दिसती दूर क्षितिजावरती प्राजक्ताचे सडे.
*****************************************
क्षण हे असे निसटुन जाती हातातुनी,
मग काय उपयोग आहे रडूनी,
या क्षणाचे सोने करावे,
आयुष्य अवघे या क्षणात जगावे.
*****************************************
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खूप सारे प्रेम अन थोडासा रागवा,
नको अंतर कधी नको दूरावा,
पावसाला लाजवेल इतका
मैत्री मधे असावा ओलावा.
*****************************************
गुलाबी थंडी सोनेरी प्रकाश,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवे प्रयत्न नवा विश्वास,
नव्या यशासाठी नवा ध्यास.
*****************************************
Related Posts Plugin for WordPress, Blogger...